{"product_id":"book-h266","title":"\" Covid - 19 सह आयुष्याचे रंग \"","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e आपण कौटुंबिक माणसं , कुटुंब घेऊन जगणारी माणसं , म्हणजेच कौटुंबिक समस्या घेऊन जगणारी माणसं . समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन जगणारी माणसं . नकळतपणे विसरतो की अपेक्षा मागे ठेवूनच या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे . कदाचित यालाच जीवनचक्र म्हणावं लागेल .\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e जीवन प्रवाहात प्रवाहीत असताना निरपेक्षपणे जीवन व्यतीत करणा-या काही पुण्यात्म्यांचा स्पर्श आपल्या नळतपणे आपल्याला होत असतो . अशावेळी आपण जर आपले विचार बुद्धी , चारित्र्य यांची शुचिता ठेवून मार्गक्रमण करीत असलो तरच आपल्याला त्या परिस स्पर्शाची जाणीव होत असते . अन्यथा आपण आयुष्याने दिलेल्या एका अनोख्या मेजवानीला मुकतो .\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e अशीच एक मेजवानी कोरोनानं आपल्याला दिली . आपल्या आजुबाजूच्या व्यक्तिंच्या अंतर्मनात डोकावण्याची . खरंतर कोणाच्या अंतर्मनात घुसून प्रवास करणं एवढं सोपं नसतं . पण प्रवास सुरू झाला आणि आवड निर्माण झाली तर मात्र हा प्रवास कधीच संपू नये असं वाटतं , किंबहुना आपला लांब पल्ल्याचा झालेला प्रवास सुद्धा आत्ता कुठं सुरू झालाय असं वाटतं . कदाचित हे वाटणंच मृत्यू नंतर सुद्धा जगण्याची आशा दाखवत असावं . मृत्यू म्हणजे शेवट नाही यावर शिक्कामोर्तब करत असावं .\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e कोरोनाच्या मृत्यू शय्येवर जाऊन परत आलेल्या प्रत्येकाला हे सत्य जाणवलेलं असावं . खरंतर या कोरोना कालावधीमध्ये खूप खूप जणांनी खूप खूप जणांच्या अंतर्मनात कळत नकळतपणे प्रवास केला असावा असं वाटतं . म्हणूनच या काव्यसंग्रहास \" Covid - 19 सह आयुष्याचे रंग \" हे नाव योग्य वाटलं .\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\u003cp\u003e\u003cstrong\u003e श्री . विजय मनसुख वाघेला \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"INAudio","offers":[{"title":"Audiobook","offer_id":49416315732272,"sku":"BDh266","price":5.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0879\/2784\/9264\/files\/h266-Square-cover.jpg?v=1773523453","url":"https:\/\/downpour.com\/products\/book-h266","provider":"Downpour","version":"1.0","type":"link"}