{"product_id":"book-2ppx","title":"Pratyek Minitacha Upayog kara","description":"\u003cp\u003eकाहीजण म्हणतात की, 'Time is Money' हे आम्हाला मान्य आहे. पण आमच्याजवळ उधळायला Money म्हणजे द्रव्य नाही. म्हणून आम्ही आपले द्रव्याऐवजी वेळच उधळतो ! पण हे तर्कदुष्ट विधान आहे. तुम्ही जर वेळ उधळणे बंद केले आणि तो वेळ द्रव्य, मिळवण्याच्या कामाला लावला तर तुमच्याकडे भरपूर द्रव्य जमेल व उधळले तरी ते संपणार नाही. म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक मिनिटाचा उपयोग कसा करायचा हेच या पुस्तकात सांगितले आहे.\u003c\/p\u003e\u003cp\u003eवेळ किती महत्त्वाचा आहे हे सर्व थोर लोकांना माहिती होते. महात्मा गांधींनी शर्टकोट या वस्त्रांचा त्याग केला पण घड्याळाचा त्याग केला नाही. एक घड्याळ त्यांच्या कमरेला सदैव अडकवलेले असायचे. त्यांच्या भेटीला पंडित नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासारखे थोर नेते आले तरी त्यांना ते वेळ देत व दिलेल्या वेळात सर्व संभाषण आवरायला सांगत, दिलेली वेळ संपल्यावर ते संभाषण थांबवत असत ! वेळेबाबत इतके काटेकोर राहिल्यामुळेच महात्मा गांधी महान कार्य करु शकले. प्रत्येक माणसाच्या दैनिक जीवनात अत्यंत महत्वाचा असा काही समय असतो. यालाच इंग्रजीत 'Prime Time' असे म्हणतात. प्रत्येकाने हा Prime Time अतिशय काळजीपूर्वक वापरला पाहिजे व त्या वेळात ठरलेल्या कार्यापेक्षा दुसरे कोणतेही काम करता कामा नये.\u003c\/p\u003e\u003cp\u003eप्रत्येकाने आपला 'वेळ वाया कसा जातो' याकडे लक्ष दिले पाहिजे. एखादा मित्र येतो आणि अत्यंत फालतू विषयावर गप्पा मारतो. हा मित्र तुमचा वेळ चोरत असतो. द्रव्य चोरले तर पुन्हा मिळवता येते. पण चोरीला गेलेला वेळ केव्हाही परत मिळत नाही. या पुस्तकात शेवटच्या प्रकरणामध्ये समय वाया जाण्याचे प्रकार दिले आहेत. ते नीट लक्षात ठेवा आणि समय केव्हाही व्यर्थ जाऊ देऊ नका, प्रत्येक मिनिट तुम्ही उपयुक्त कार्यासाठी वापरले तरच तुमचा उत्कर्ष होणार आहे. ही खूणगाठ तुम्ही बांधा.\u003c\/p\u003e","brand":"INAudio","offers":[{"title":"Audiobook","offer_id":67872899563824,"sku":"BD2ppx","price":2.99,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0879\/2784\/9264\/files\/2ppx-Square-cover.webp?v=1790615542","url":"https:\/\/downpour.com\/products\/book-2ppx","provider":"Downpour","version":"1.0","type":"link"}